डॉ. राजन गणपती गवस यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावी २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला २००१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
राजन गवस यांचे रविवारच्या 'सकाळ'च्या 'सप्तरंग' पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचत. राजन गवस यांची 'चौंडकं' ही कादंबरी खूप गाजली. ते मुक्त लेखक आहेत. 'लोकसत्ता'च्या शनिवारच्या 'चतुरंग' या पुरवणीत 'सुत्तडगुत्तड' या सदरात ते लेखन करीत असत.
राजन गवस
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.