उमा कुलकर्णी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

डॉ. सौ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी (पूर्वाश्रमीच्या सुषमा कुलकर्णी, जन्म : बेळगाव, १ ऑक्टोबर १९५०) या मराठी अनुवादक आहेत. त्यांनी यू.आर. अनंतमूर्ती, एस.एल. भैरप्पा, वैदेही, के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी व इतर कन्‍नड लेखकांच्या साहित्याचे मराठीमध्ये अनुवाद केले आहेत. १९८२ मध्ये उमा कुलकर्णी यांचा शिवराम कारंत यांच्या कादंबरीचा 'तनमनाच्या भोवऱ्यात. हा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला. यानंतर कारंतांचेच 'डोंगराएवढा' हे अनुवादित पुस्तक प्रकाशित झाले. पुढे उमा कुलकर्णी यांनी एस.एल. भैरप्पा यांच्या कानडी कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद करायचा सपाटा लावला. सुरुवात भैरप्पांच्या 'वंशवृक्ष' पासून सुरुवात करून २०१९ सालापर्यंत त्यांनी भैरप्पांच्याच एकूण बारा कादंबऱ्या अनुवादल्या आहेत.

सौ. उमा कुलकर्णी यांनी केलेले ५५हून अधिक अनुवाद पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहेत.(सन २०१९ची स्थिती). सौ उमा कुलकर्णी यांनी सुनीता देशपांडे यांचे 'आहे मनोहर तरी' कानडीत आणले, पण त्याच्या प्रकाशनासाठी त्यांना बरीच वर्षे प्रकाशक मिळाला नाही. प्रकाशक म्हणाले, 'आम्ही आणि आमचे कानडी लोक पु.ल. देशपांडे यांना ओळखत नाहीत, तर त्यांच्या बायकोला शक्यच नाही. सुनीता देशपांडे यांचे पुस्तक कर्नाटकात खपणार नाही.'

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →