मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

प्राचार्य मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर (जन्म : फेब्रुवारी १, १९२७; - जानेवारी २५, २०१५) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी आजचे मराठीतील आघाडीचे लेखक विश्वास पाटील, राजन गवस, दादासाहेब मोरे यांच्यापासून सांगली परिसरातील नामदेव माळी, दिलीप शिंदे, दयासागर बन्ने, चैतन्य माने अशा अनेक नवोदित लेखकांना लिहिते केले, त्यांना प्रकाशक शोधून दिले. ’कोसला‘कार भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी गाजण्याआधी हातकणंगलेकरांनी नेमाडे यांना सांगलीच्या ’विलिंग्डन’ कॉलेजात व्याख्यानास निमंत्रित केले होते.

मराठीतील अक्षरवाङ्‌मय इंग्रजीत अनुवादित करून त्यांनी मराठीचे स्थान देश आणि जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले. महाराष्ट्राबाहेरच्या भारताला आणि जागतिक साहित्यविश्‍वाला मराठीतील कसदार लेखन पोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची ठरली.

विलिंग्डन महाविद्यालय, सांगलीचे प्राचार्य म्हणून हातकणंगलेकरांनी केलेली कामगिरीही अजोड राहिली. एखाद्या महाविद्यालयाचे नाव एखाद्या प्राचार्याशी जोडले जाण्याचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →