अमृतमहाल किंवा अमृतमहल हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून विशेष करून कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. या जातीचा बैल शेतीकामासाठी उपयुक्त आहे.
ही प्रजाती हल्लीकरपासून निर्माण झालेली आहे. प्राचीन काळी यांचा वापर युद्धक्षेत्री साहित्याची ने-आण करण्यासाठी होत असे. यांची काम करण्याची चांगली क्षमता आणि वेगवान गती यासाठी हे बैल वापरले जातात. प्राचीनकाळापासून गोला आणि हल्लीकर जमातींनी या प्राण्यांची पैदास आणि संवर्धन केले. त्याच सोबत विजयनगरचे तत्कालीन महाराज चिक्कदेवराय वोडियार, सुलतान हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी दिलेला राजाश्रयसुद्धा या संवर्धनास कामी आला. . जास्त वेळ काम, कमी चारा -पाणी अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याच्या गुणधर्मामुळे जरी ही प्रजाती चांगली वाढली तरी पण यामुळे यांची दूध देण्याची क्षमता कमी होत गेली. आणि सद्यस्थितीत तर कमी दूध देणारी प्रजाती म्हणून दुर्लक्षित होत आहे. याचा परिणाम म्हणून ही प्रजाती भविष्यात नष्ट होऊ शकते.
अमृतमहाल गाय
थोडक्यात पण महत्त्वाचे.