अफगाणिस्तान क्रिकेट संघ जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ दरम्यान झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला होता. दौऱ्यावर पाच एकदिवसीय सामने खेळवले गेले. एकदिवसीय मालिकेआधी, अफगाणिस्तान अ संघाने झिम्बाब्वे अ संघाविरुद्ध पाच "अनधिकृत" सामन्यांमध्ये भाग घेतला. ह्या सर्व सामन्यांना लिस्ट-अ चा दर्जा होता. ही मालिका अफगाणिस्तान अ ने ४-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेमध्ये अफगाणिस्तान संघाने ३-२ असा विजय मिळवला
एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होण्याआधी, झिम्बाब्वे क्रिकेटने दौऱ्याची पुर्वतयारी म्हणून स्थानिक लिस्ट अ स्पर्धा प्रो५० चॅंपियनशीप, २०१६-१७ पुढे आणली.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६-१७
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.