२०२५ पुरुषांचा आशिया कप (ज्याला प्रायोजकत्वाच्या कारणास्तव डीपी वर्ल्ड आशिया चषक म्हणूनही ओळखले जाते) ही १७वी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा होती. सदर स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली गेली. स्पर्धेतील सामने आंतरराष्ट्रीय टी२० स्वरूपात खेळवले गेले. भारत २०२३ चा गतविजेता होता.
या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. आशियाई क्रिकेट परिषदेचे पाच पूर्ण सदस्य, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, भारत आणि श्रीलंका हे संघ आपोआप या स्पर्धेसाठी पात्र ठरले आणि त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिराती, ओमान आणि हाँगकाँग हे संघ सामील झाले, ह्या तीन संघांनी २०२४ एसीसी पुरुष प्रीमियर चषक स्पर्धेमध्ये पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले होते. अंतिम सामन्यात, भारताने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि त्यांचे नववे विजेतेपद जिंकून जेतेपद कायम ठेवले.
२०२५ आशिया चषक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.