२०२४ एसीसी १९ वर्षांखालील आशिया चषक ही एसीसी १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेची अकरावी आवृत्ती होती, मर्यादित षटकांच्या ह्या क्रिकेट स्पर्धेत आठ १९ वर्षांखालील खेळाडूंच्या संघांचा समावेश होता. सादर स्पर्धा २९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२४ दरम्यान पार पडली. जपान, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती ह्या पात्रता फेरीतील क्रमवारीतील तीन अव्वल संघांसह, अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका ह्या आशियाई क्रिकेट समितीच्या पाच पूर्ण सदस्यांनी या स्पर्धेत भाग घेतला.
बांगलादेश गतविजेता होता, त्याने २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा १९५ धावांनी पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले होते.
बांगलादेशने अंतिम फेरीत भारताचा ५९ धावांनी पराभव करत सलग दुसरे विजेतेपद पटकावले.
२०२४ एसीसी १९ वर्षांखालील आशिया चषक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.