२०२४ महिला ट्वेंटी-२० आशिया चषक ही महिला आशिया चषक स्पर्धेची नववी आवृत्ती होती, ज्याचे सामने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने म्हणून खेळले गेले. जानेवारी २०२३ मध्ये, आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) २०२३ आणि २०२४ साठी पथवे संरचना आणि कॅलेंडर जाहीर केले, जिथे त्यांनी स्पर्धेच्या तारखा आणि संघांची पुष्टी केली.
जुलै २०२४ च्या अखेरीस आठ संघांद्वारे ही स्पर्धा खेळली गेली. आशियाई क्रिकेट परिषदेचे चार पूर्ण सदस्य – बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका – आपोआप पात्र ठरले. २०२४ एसीसी महिला प्रीमियर चषक मधील (मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती) अंतिम स्पर्धकांमध्ये ते सामील होतील असे मूलतः घोषित करण्यात आले होते; तथापि, मार्च २०२४ मध्ये, एसीसीने महिला प्रीमियर चषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील स्पर्धकांसह नेपाळ आणि थायलंडचाही समावेश केला असल्याचे जाहीर केले. अंतिम फेरीत श्रीलंकेने भारताचा ८ विकेट्सने पराभव करत आशिया चषक स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले.
२०२४ महिला ट्वेंटी-२० आशिया चषक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?