मलेशिया क्रिकेट संघाने जून २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सिंगापूराचा दौरा केला. मालिकेला २०२२ स्टॅन नागय्या चषक नाव दिले गेले. स्टॅन नागय्या चषक स्पर्धेची ही चौवीसावी आवृत्ती होती. आणि प्रथमच चषकाला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा दिला गेला. सर्व सामने इंडियन असोसिएशन मैदान येथे खेळविण्यात आले. सिंगापूरने हे सामने २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट ब स्पर्धेच्या तयारीसाठी खेळले. तर मलेशियाने नंतर त्यांच्या मायदेशात चौरंगी मालिकेचे आयोजन केले.
सिंगापूरने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. परंतु नंतर अनपेक्षितपणे शेवटचे दोन्ही सामने मलेशियाने जिंकले आणि स्टॅन नागय्या चषक २-१ ने जिंकला.
२०२२ स्टॅन नागय्या चषक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?