२०२२ मलेशिया चौरंगी मालिका ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली चौरंगी क्रिकेट स्पर्धा २ ते ११ जुलै २०२२ दरम्यान मलेशियामध्ये खेळवली गेली. यजमान मलेशियासह भूतान, थायलंड आणि मालदीव या चार देशांच्या क्रिकेट संघांनी चौरंगी मालिकेत भाग घेतला. सर्व सामने बंगी मधील युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल येथे खेळवण्यात आले.
गट फेरीतून मलेशिया आणि भूतान अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यामध्ये मलेशियाने भूतानचा ९ गडी राखून पराभव करत चौरंगी स्पर्धा जिंकली.
२०२२ मलेशिया चौरंगी मालिका
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.