पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाने जुलै २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सिंगापूराचा दौरा केला. मालिकेला २०२२ सिंगा अजिंक्यपद चषक नाव दिले गेले. सर्व सामने इंडियन असोसिएशन मैदान येथे खेळविण्यात आले. सिंगापूरने हे सामने दोन्ही संघांच्या २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट ब स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजीत केली होती. तसेच दोन्ही देशांमधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती.
सिंगापूरने पहिला सामना १८ धावांनी जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यामध्ये सुरेंद्र चंद्रमोहनच्या शतकाच्या जोरावर सिंगापूरने २०३ धावा केल्या. परंतु पापुआ न्यू गिनीने हे लक्ष्य सहज पार करून सामना जिंकला. तिसरा ट्वेंटी२० सामना पावसामुळे रद्द करावा लागल्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
२०२२ सिंगा अजिंक्यपद चषक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?