२०२०-२१ नेपाळ तिरंगी मालिका ही नेपाळमध्ये १७ ते २४ एप्रिल २०२१ दरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान नेपाळसह नेदरलँड्स आणि मलेशिया ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्व सामने हे किर्तीपूर मधील त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वर खेळविले गेले.
गट फेरीतील ५वा सामना जो की नेदरलँड्स आणि मलेशिया मध्ये खेळवला गेला होता तो सामना पावसामुळे बरोबरीत सुटला. निर्धारीत वेळ निघून गेल्यामुळे सुपर ओव्हर खेळवता आली नाही. परिणामी नेपाळ आणि नेदरलँड्स हे दोन देश गट फेरीत अव्वल दोन स्थानांवर राहिल्याने अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. २४ एप्रिल २०२१ रोजी खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळने नेदरलँड्सचा १४२ धावांनी दणदणीत पराभव करत त्रिकोणी मालिका जिंकली. नेपाळच्या कुशल भुर्टेलला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याने सर्व सामन्यांमधील मिळून स्पर्धेतील सर्वाधिक २७८ धावा केल्या.
२०२०-२१ नेपाळ तिरंगी मालिका
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?