२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

या विषयावर तज्ञ बना.

२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताच्या १२२ खेळाडूंनी १८ स्पर्धांमध्ये भाग घेतला. हे तेव्हापर्यंतचे भारताचे सगळ्यात मोठे पथक होते. त्यांनी १ सुवर्ण, २ रजत आणि ४ कांस्य पदके मिळवली.

जपानच्या तोक्यो शहरात झालेल्या या स्पर्धा कोविड-१९च्या साथीमुळे २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० ऐवजी, २३ जुलै ते ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

भारताने सर्वप्रथम १९०० मध्ये पॅरिसमधील उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये अधिकृत भाग घेतला होता. त्यानंतर १९२० पासून भारतीय संघ उन्हाळी ऑलिम्पिकच्या प्रत्येक आवृत्तीत सहभागी झाला आहे.

दक्षिण आफ्रिकी गोल्फपटू पॉला रेटोने उशीराने घेतलेल्या माघारी मुळे २८ जुलै २०२१ रोजीमहिलांच्या वैयक्तिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनकडून भारतीय गोल्फर दीक्षा डागरला अचानक आमंत्रण मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →