२०१९ इंडियन प्रीमियर लीग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२०१९ इंडियन प्रीमियर लीग

इंडियन प्रीमियर लीगचा २०१९चा मोसम हा आयपीएल १२ किंवा विवो आयपीएल २०१९ म्हणूनही ओळखला जाणारी स्पर्धा एप्रिल-मे २०१९ मध्ये खेळविण्यात येणार आहे. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा बारावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०१८चा मोसम ७ एप्रिल २०१७ रोजी सुरू झाला तर २७ मे २०१८ रोजी अंतिम सामन्याने मोसमाची सांगता झाली. २०१८ च्या मोसमामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. वृत्तपत्रांच्या बातम्यांनुसार २०१९ लोकसभा निवडणुकांमुळे हा हंगाम दक्षिण आफ्रिका अथवा संयुक्त अरब अमिराती येथे होणार असल्याची शक्यता होती.

भारत क्रिकेट संघाचा क्रिकेट विश्वचषक, २०१९मधील २ जूनचा सामना ५ जूनला खेळविण्यात येणार आहे कारण लोढा समितीच्या शिफारसीनुसार आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये किमान १५ दिवसांची विश्रांती असणे आवश्यक आहे.

४ डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नाव बदलून दिल्ली कॅपीटल्स ठेवण्यात आले.

१२ मे २०१९ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून चवथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवले. डेव्हिड वॉर्नरने स्पर्धेमध्ये सर्वाधिक ६९२ धावा करून ऑरेंज कॅप मिळवली, तर चेन्नई सुपर किंग्सच्या इम्रान ताहिरने सर्वाधिक २६ बळी मिळवत पर्पल कॅपचा मान मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आंद्रे रसेल ह्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. कोलकात्याचाच शुभमन गिल स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूला दिल्या जाणाऱ्या खास पुरस्काराचा मानकरी ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →