२०१३ इंडियन प्रीमियर लीग ही २०१३ साली भारतात झालेली क्रिकेट स्पर्धा होती. स्पर्धेच्या हंगामाचे लघुनाव आयपीएल ६ किंवा आयपीएल २०१३ असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळने २००७ मध्ये सुरुवात केल्या नंतरचा हा सहावा हंगाम होता. याचा उद्घाटन सोहळा सॉल्ट लेक मैदान, कोलकाता येथे झाला. स्पर्धा ३ एप्रिल ते २६ मे दरम्यान खेळवली गेली. डेक्कन चार्जर्स या संघाऐवजी सनरायझर्स हैदराबाद हा संघ या हंगामात खेळला. यासह ९ संघ स्पर्धेत सहभागी झाले. मुख्य पुरस्कर्त्यांच्या स्वरूपात पेप्सिको प्रथमच या सत्रात सहभागी झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१३ इंडियन प्रीमियर लीग
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?