२०२२ भारतीय प्रीमियर लीग, आयपीएल १५ किंवा टाटा आयपीएल २०२२ (प्रायोजित नाव), हा भारतीय प्रीमियर लीग (आयपीएल)चा पंधरावा मोसम असणार आहे, ही एक व्यावसायिक ट्वेंटी२० क्रिकेट लीग आहे जी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००७ मध्ये सुरू केली. स्पर्धा २६ मार्च २०२२ रोजी सुरू होईल आणि २९ मे २०२२ रोजी अंतिम फेरीने समारोप होणार आहे. स्पर्धेची गट फेरी संपूर्णपणे महाराष्ट्रात खेळवली जाईल, मुंबई आणि पुणे हे सामने आयोजित करतील. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक ६ मार्च २०२२ रोजी जाहीर करण्यात आले.
ह्या मोसमामध्ये दोन नवीन फ्रँचायझींच्या समावेशासह लीगचा विस्तार होणार आहे. २०११ च्या स्पर्धेनंतर दहा संघ असणारी ही दुसरी स्पर्धा ठरेल. चेन्नई सुपर किंग्स हे गतविजेते आहेत, त्यांनी मागील हंगामात चौथे विजेतेपद पटकावले आहे.
अंतिम सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करत गुजरात टायटन्सने पहिले वहिले आयपीएल विजेतेपद आपल्या नावावर केले.
२०२२ इंडियन प्रीमियर लीग
थोडक्यात पण महत्त्वाचे.