२०१८ तथा २०१८: एव्हरीवन इझ अ हीरो हा केरळच्या २०१८ मधील पूरस्थितीवरील २०२३ चा भारतीय मल्याळम भाषेतील सर्वायव्हल थरारपट आहे. याचे दिग्दर्शन जुड अँथनी जोसेफ यांनी केले आहे, ज्यांनी अखिल पी. धर्मजन सोबत पटकथा देखील लिहिली आहे. चित्रपटात टोविनो थॉमस, कुंचाको बोबन, नरेन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन आणि लाल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
सुरुवातीला २१ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता, तो अखेरीस ५ मे २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि सिनेमॅटोग्राफीसाठी या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. तिकीट खिडकीवर ₹२०० कोटींहून अधिक कमाई करून हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा सर्वकालीन मल्याळम चित्रपट बनला. तसेच हा चित्रपट २०२३ मधील नवव्या क्रमांकाचा भारतीय चित्रपट म्हणून उदयास आला.
२०१८ (चित्रपट)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.