द केरळ स्टोरी हा २०२३ मधील सुदिप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा ही केरळमधील महिलांच्या अशा एका गटाची कथा आहे ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) मध्ये त्या सामील झाल्या. केरळमधील हजारो महिलांचे इस्लाममध्ये धर्मांतर करून ISIS मध्ये भरती केल्याचा दावा केल्यामुळे हा चित्रपट विवादास्पद ठरला आहे.
काँग्रेस पक्षाने लव्ह जिहाद ही काल्पनिक गोष्ट आहे आणि हा चित्रपट संघ परिवाराच्या अजेंडाचा प्रचार आहे अशी टीका केली आहे.
या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी इदनानी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित झाला असून यावर चित्रपट समीक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे.
द केरळ स्टोरी
यामागील विज्ञान आणि इतिहास.