द केरळ स्टोरी २

थोडक्यात पण महत्त्वाचे.

द केरळ स्टोरी २ गोज बियाँड हा २०२६ चा हिंदी भाषेतील चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केले असून निर्मिती सनशाइन पिक्चर्सच्या माध्यमातून विपुल अमृतलाल शाह यांची आहे. २०२३ सालच्या द केरळ स्टोरी चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. या चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या भूमिका आहेत.

या चित्रपटाच्या झलक (टीझर आणि ट्रेलर)च्या प्रसारणानंतर काही कायदेशीर आणि राजकीय वादविवाद निर्माण झाले. परंतु सर्व अडथळे पार पाडून हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतभर प्रदर्शित झाला आणि समीक्षकांकडून त्याला संमिश्र पुनरावलोकने मिळाली. याउलट या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ लाख, दुसऱ्या दिवशी ४.६५ कोटी, तर तिसऱ्या दिवशी ५ कोटीचा गल्ला जमा करत केवळ तीन दिवसात १० कोटीच्या पुढे कमाई केली. विशेष म्हणजे या चित्रपटाचे एकूण बजेट २८-३० कोटी इतकेच आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →