धुरंधर (चित्रपट)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

धुरंधर हा २०२५ चा हिंदी भाषेतील साहस मारधाड हेरपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन आदित्य धर यांचे असून धर हे सह-निर्माते देखील हे. ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी जिओ स्टुडिओज आणि बी६२ स्टुडिओजच्या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या प्रमुख भूमिका असून मानव गोहिल, दानिश पांडोर, सौम्या टंडन, गौरव गेरा आणि नवीन कौशिक यांनी सहाय्यक भूमिकेत काम केले आहे.

हा चित्रपट भू-राजकीय तणाव आणि भारताच्या संशोधन आणि विश्लेषण विभाग अर्थात रॉ द्वारे चालवल्या जाणाऱ्या गुप्त कारवायांवर आधारित आहे. हा चित्रपट भारत पाकिस्तान मधील भूतपूर्व घटनांपासून प्रेरित आहे. विशेषतः ऑपरेशन लियारी, २००८ मधील मुंबई हल्ला, टोळ्या आणि गुन्हेगारी गटांवरील कारवाईशी संबंधित घटनांपासून याची निर्मिती करण्यात आली आहे. हा आतापर्यंत बनवलेल्या सर्वात मोठ्या भारतीय चित्रपटांपैकी एक असून याची लांबी सुमारे २१४ मिनिटांची आहे.

त्यानंतरचा चित्रपट, धुरंधर: भाग २ - रिव्हेंज, १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →