शेरनी हा २०२१ चा भारतीय हिंदी भाषेतील थरारपट आहे जो अमित व्ही. मसुरकर दिग्दर्शित आहे आणि टी-सीरीज आणि अबुंडंशिया एंटरटेनमेंट निर्मित आहे. या चित्रपटात विद्या बालन ह्या भारतीय वन सेवा अधिकाऱ्याच्या मुख्य भूमिकेत आहे, तर सोबत शरत सक्सेना, विजय राज, इला अरुण, ब्रिजेंद्र काला, नीरज काबी आणि मुकुल चड्ढा हे सहाय्यक भूमिकेत आहे. हा चित्रपट १८ जून २०२१ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला.
हा चित्रपट मानव-वन्यजीव संघर्ष आणि वन्यजीव संवर्धनाशी संबंधित आहे ज्यात एका वाघिणीला वाचवण्याबद्दल कथा आहे. चित्रपटाचे शीर्षक थोडे चुकीचे आहे, कारण हिंदीमध्ये शेरनी म्हणजे सिंहीण होय, तर वाघिणीसाठी औपचारिक शब्द बागीन आहे. तथापि, शेरनी हा शब्द वाघिणींसाठी देखील वारंवार वापरला जातो. विद्या बालनच्या अभिनयाबद्दल आणि वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व व त्याची जागरूकता निर्माण केल्याबद्दल चित्रपट समीक्षकांकडून शेरनीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
शेरनी (२०२१ चित्रपट)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.