विद्या बालन(मल्याळम: വിദ്യാ ബാലന്, तमिळ: வித்யா பாலன், जन्मः १ जानेवारी १९७८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. सध्या भारतामधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी मानल्य जाणाऱ्या विद्याला आजवर एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार, ५ स्क्रीन पुरस्कार इत्यादी अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. २०१४ साली भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. तिने आतापर्यंत तमिळ, हिंदी, मल्याळम आणि बंगाली भाषेत चित्रपटांत कामे केली आहेत.
१९९५ सालच्या हम पांच ह्या झी टीव्ही वरील विनोदी धारावाहिकामध्ये काम करून विद्याने अभिनयाची सुरुवात केली. २००५ सालच्या परिणीता ह्या हिंदी चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.
विद्या बालन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.