झरीन खान (जन्म : १४ मे १९८७) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. २०१० सालच्या वीर ह्या चित्रपटामध्ये सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून झरीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणाचा झी सिने पुरस्कार देखील मिळाला. तेव्हापासून तिने आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तसेच पंजाबी व तमिळ चित्रपटांमध्ये देखील कामे केली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झरीन खान
या विषयातील रहस्ये उलगडा.