जुही चावला ( ११ नोव्हेंबर १९६७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हिंदीखेरीज जुहीने तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे.
अभिनयाखेरीज जुही चित्रपट निर्मितीमध्ये देखील कार्यरत आहे. तसेच भारतीय प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स ह्या संघाची ती शाहरुख खानसोबत सह-मालकीण आहे.
जुही चावला
यामागील विज्ञान आणि इतिहास.