तापसी पन्नू (जन्म : १ ऑगस्ट १९८७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१५ सालच्या यशस्वी बेबी ह्या चित्रपटामध्ये देखील तिने भूमिका केली आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक ह्या चित्रपटामध्ये तिची आघाडीची भूमिका होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तापसी पन्नू
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.