२०१७ आयसीसी विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग ३

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०१७ आयसीसी क्रिकेट लीग विभाग तीन ही क्रिकेट स्पर्धा २३ ते ३० मे २०१७ दरम्यान युगांडा येथे पार पडली. स्पर्धेतील सामने लुगोगो, क्याम्बोगो आणि एंटेबी येथे पार पडले. स्पर्धेतील ओमान आणि कॅनडा ह्या पहिल्या दोन स्थानांवरील संघांना, विभाग दोन मध्ये बढती मिळाली. पावसामुळे अंतिम सामना अनिर्णित राहिला आणि गट फेरीतील पहिल्या स्थानावर राहिल्याने ओमानला स्पर्धेतील विजेता संघ म्हणून घोषित करण्यात आले.

स्पर्धेच्या यजमानपदासाठी कॅनडा, मलेशिया आणि युगांडा ह्या तीन देशांनी बोली लावली होती. ऑक्टोबर २०१६ मध्ये, सुरक्षाव्यवस्था आणि खर्चाची योग्य व्यवस्था असल्यास, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने स्पर्धेसाठी युगांडाचा प्रस्ताव मान्य केला. डिसेंबर २०१६ मध्ये दोन आयसीसी अधिकाऱ्यांनी, देशाची फर्स्ट लेडी जॅनेट मुसेवेनी आणि पंतप्रधान रुहाकाना रुगुंडा यांची भेट घेतली. मुसोविनींनी ह्यावेळी स्पर्धेला पाठींबा दर्शविला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →