२०१४ हॉकी विश्वचषक ही पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेची दहावी आवृत्ती ३१ मे ते १५ जून, इ.स. २०१४ दरम्यान नेदरलँड्स देशामधील द हेग शहरात खेळवली गेली. १९७३ व १९९८ नंतर हा विश्वचषक नेदरलँड्स देशात तिसऱ्यांदा खेळवला गेला. ह्या स्पर्धेमध्ये १२ देशांच्या राष्ट्रीय पुरुष हॉकी संघांनी सहभाग घेतला.
ह्या स्पर्धेमधील बहुतेक सर्व सामने हेग शहरामधील क्योसेरा स्टेडियोन ह्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आले. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यामध्ये यजमान नेदरलँड्सला ६-१ असे पराभूत करून हा विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकला.
२०१४ हॉकी विश्वचषक
या विषयातील रहस्ये उलगडा.