२०१४ फिफा विश्वचषक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची विसावी आवृत्ती आहे. ही स्पर्धा जून १२ ते जुलै १३ दरम्यान ब्राझिल देशामध्ये खेळवली जात आहे. १९५० नंतर दुसऱ्या वेळेस ब्राझील ह्या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. आर्जेन्टिनामधील १९७८ फिफा विश्वचषकानंतर ही स्पर्धा प्रथमच दक्षिण अमेरिका खंडात भरवली जात आहे.

मार्च २००३ मध्ये फिफाने २०१४ सालचा विश्वचषक दक्षिण अमेरिकेमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. ब्राझिल व कोलंबिया ह्या दोनच देशांनी यजमानपद स्वीकारण्यात स्वारस्य दाखवले. ३० ऑक्टोबर २००७ रोजी फिफा अध्यक्ष सेप ब्लॅटर ह्याने ब्राझीलची निवड झाल्याचे जाहीर केले.

गतविजेत्या स्पेनवर साखळी फेरीमध्येच पराभवाची नामुष्की ओढवली तर यजमान ब्राझिलला उपांत्यफेरीत पराभव पत्कारावा लागला. १३ जुलै २०१४ रोजी रियो दि जानेरोतील माराकान्या स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये जर्मनीने आर्जेन्टिनाला अतिरिक्त वेळेमध्ये १-० असे पराभूत करून विश्वचषक चौथ्यांदा जिंकला. अमेरिका खंडात आयोजीत करण्यात आलेल्या विश्वचषकामध्ये ह्या खंडाबाहेरील संघाने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →