हॉकी विश्वचषक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हॉकी विश्वचषक (Hockey World Cup) ही आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळने आयोजित केलेली हॉकी स्पर्धा आहे. इ.स. १९७१मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा दर चार वर्षांनी ओयोजित करण्यात येते. ही स्पर्धा ऑलिंपिक खेळ असलेल्या वर्षांत होत नाही. इ.स. १९७४ ते इ.स. १९८१ पर्यंत आंतरराष्ट्रीय महिला हॉकी संघटननेने स्त्रीयांसाठीचा विश्वचषक आयोजित केला होता. त्यानंतर दोन्ही संघटना एकत्र आल्या.

या स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान, नेदरलँड्स व जर्मनीने आपले वर्चस्व गाजवले आहे. पाकिस्तान चार वेळा, नेदरलँड्स तीन वेळा तर जर्मनी व ऑस्ट्रेलिया दोन वेळा विजयी संघ ठरले. भारताने ही स्पर्धा एकदा जिंकली आहे.

२०१४ सालची विश्वचषक स्पर्धा नेदरलँड्स देशाच्या हेग ह्या शहरामध्ये ३१ मे ते १४ जून दरम्यान खेळवण्यात येत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →