२००९ २०-२० चँपियन्स लीग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२००९ २०-२० चँपियन्स लीग

२००९ २०-२० चँपियन्स लीग हे आंतरराष्ट्रीय क्लब क्रिकेट स्पर्धा प्रथमच झाली. ही स्पर्धा भारतात ८ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान खेळवली गेली. विजेत्या संघाला ६० लाख अमेरिकन डॉलरचे बक्षिस मिळाले.भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यू झीलँड आणि वेस्ट इंडीज मधील क्लब ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळले. २०-२० चँपियन लीगचे अध्यक्ष ललित मोदी होते. भारतीय प्रिमियर लीगच्या यशानंतर २००८ मध्ये ह्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्या नंतर २००८ मधील स्पर्धा रद्द करण्यात आली. . भारतीय मोबाईल कंपनी भारती एरटेलने स्पर्धेच्या नावाचे हक्क १७० कोटी रुपयात विकत घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →