१९०० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

थोडक्यात पण महत्त्वाचे.

१९०० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

फ्रान्स मधील पॅरीस येथे खेळविल्या गेलेल्या १९०० उन्हाळी ऑलिंपिक मध्ये भारतातर्फे नॉर्मन प्रिचर्ड हा एकमेव ॲथलिट सहभागी झाला. मॉडर्न ऑलिंपिक मधील हा भारताचा सर्वात पहिला सहभाग ठरला. ऑलिंपिक इतिहासकारांनी त्यावेळी भारत देश स्वतंत्र नव्हता तरीही भारताचे निकाल ब्रिटिशांच्या निकालापासून वेगळे केले. अशाच प्रकारे १९०१ मध्ये ऑस्ट्रेलियाचे निकाल सूद्धा वेगळे केले गेले होते.

२००५ मध्ये आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स संघ मंडळाने (IAAF) २००४ उन्हाळी ऑलिंपिकसाठी प्रकाशित केलेल्या फिल्ड आणि ट्रॅक आकडेवारीमधील ऐतिहासिक माहीतीमध्ये नॉर्मन प्रिचर्डचा उल्लेख इंग्लंडकडून सहभागी झाल्याचा आहे. ऑलिंपिक इतिहासकारांनी केलेल्या संशोधनाच्या निष्कर्श असे दर्शवितात की जून १९०० मध्ये झालेल्या ब्रिटिश AAA चॅम्पियनशिप नंतर नॉर्मन प्रिचर्डने यापूढे ग्रेट ब्रिटनकडून खेळणार असल्याचे घोषित केले.अजूनही प्रितचर्ड हा भारताकडूनच खेळला असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती मान्य करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →