ह्युस्टन हे अमेरिका देशातील चौथे मोठे व टेक्सास राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. टेक्सास राज्याच्या पूर्व भागात मेक्सिकोच्या आखाताच्या जवळ १,५५८ चौरस किमी एवढ्या विस्तृत भूभागावर वसलेल्या ह्युस्टन शहराची लोकसंख्या २०१० साली २३ लाख इतकी तर ह्युस्टन-शुगरलँड-बेटाउन ह्या महानगराची लोकसंख्या सुमारे ६० लाख होती.
ह्युस्टन हे अमेरिकेतील अतिप्रगत व सुबत्त शहरांपैकी एक आहे. ऊर्जा, संरक्षण, यांत्रिक उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा हे येथील प्रमुख उद्योग आहेत. जगातील अनेक मोठ्या तेल उत्पादन कंपन्यांची मुख्यालये ह्युस्टनमध्ये आहेत. जगातील सर्वात मोठा हॉस्पिटल-समूह ह्युस्टनच्या टेक्सास मेडिकल सेंटर येथे आहे..
ह्युस्टन
या विषयावर तज्ञ बना.