एल पॅसो (इंग्लिश: El Paso, पर्यायी उच्चारः एल पासो) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या टेक्सास राज्यामधील एक शहर आहे. पश्चिम टेक्सासमध्ये मेक्सिको देशाच्या व न्यू मेक्सिको राज्याच्या सीमेवर व रियो ग्रांदे नदीच्या किनारी वसलेले एल पासो हे टेक्सासमधील सहव्या क्रमांकाचे तर अमेरिकेतील १९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१० साली एल पॅसो शहराची लोकसंख्या ६.५ लाख तर महानगरीय क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ८ लाख होती. गेल्या १० वर्षात येथील लोकसंख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे.
एल पॅसो मेक्सिकोच्या सिउदाद हुआरेझ शहराचे जुळे शहर समजले जाते. हुआरेझ हे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या माफियांमुळे जगातील सर्वात धोकादायक शहरांपैकी एक मानले जाते तर एल पॅसोला २०१० साली अमेरिकेतील सर्वात सुरक्षित मोठे शहर हा पुरस्कार मिळाला.
एल पॅसो (टेक्सास)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!