होळकर क्रिकेट मैदान हे इंदूर, मध्य प्रदेश येथील क्रिकेट मैदान आहे.
आधी हे मैदान महाराणी उषाराजे ट्रस्ट क्रिकेट मैदान म्हणून ओळखले जात असे. पण २०१० साली, मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने इंदूरवर राज्य करणाऱ्या मराठ्यांचे राजघराणे होळकर यांच्या नावावरून ह्या मैदानाचे नामकरण केले.
मैदानाची आसनक्षमता ३०,००० प्रेक्षक इतकी आहे. रात्रीच्या सामन्यांसाठी मैदानावर प्रकाशझोताची व्यवस्था आहे. विरेंद्र सेहवागने एकदिवसीय इतिहासातील तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या २१९ ह्याच मैदानावार नोंदविली. ग्वाल्हेर स्थित कॅप्टन रूप सिंग मैदान, हे मध्य प्रदेशामधील आणखी एक आंतरराष्ट्रीय मैदान आहे, परंतु ते इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानापेक्षा थोडे लहान आहे. परंतु कॅप्टन रूप सिंग मैदानाची क्षमता होळकर क्रिकेट मैदानापेक्षा जास्त आहे.
रणजी करंडक स्पर्धेचे मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे अनेक सामने ह्या मैदानावर खेळवले जातात. सदर मैदानाची भारताच्या सहा नवीन कसोटी स्थळांपैकी एक म्हणून निवड झाली आहे. भारत-न्यू झीलंड कसोटी मालिकेतील ८ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरू झालेली तिसरी कसोटी हा ह्या मैदानावरील पहिला कसोटी सामना होता. भारतातील हे बावीसावे कसोटी मैदान आहे.
होळकर स्टेडियम
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.