उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे होम ग्राउंड असलेले आणि प्रकाशझोताची सुविधा असलेले भारतातील कानपूर शहरामध्ये वसलेल्या ग्रीन पार्क स्टेडियम ह्या बहुउपयोगी मैदानाची आसनक्षमता ३३,००० इतकी आहे. सदर मैदान उत्तर प्रदेश क्रीडा विभागाच्या नियंत्रणात आहे. उत्तर प्रदेशतील ह्या एकमेव आंतरराष्ट्रीय मैदानावर अनेक आंतरराष्ट्रीय कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. त्याशिवाय विवो आयपीएलचे २ सामने १९ आणि २१ मे २०१६ रोजी येथे खेळवले गेले होते. जगातील सर्वात मोठा हाताने बदलावा लागणारा धावफलक ह्या मैदानावर आहे. गंगा नदी जवळ वसलेले हे मैदान भारतातील दुसरे सर्वात मोठे मैदान आहे. मैदानाचे नाव हे येथे घोडदौडीला येणारी ब्रिटिश महिला मॅडम ग्रीनच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ह्या मैदानाचे टोपण नाव 'बिलियर्ड्स टेबल' असे आहे. मैदाना समोर असलेल्या मॅकरॉबर्ट हॉस्पिटलमध्ये जन्मलेला दिवंगत क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक बॉब वूल्मरच्या आठवणीत सदर मैदानाला वूल्मर्स टर्फ असेही संबोधले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्रीन पार्क
या विषयातील रहस्ये उलगडा.