हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळ (पूर्वीचा मॅककरान आतरराष्ट्रीय विमानतळ) (आहसंवि: LAS, आप्रविको: KLAS, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAS) अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दक्षिणेस ८ किमी (५ मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ अंदाजे २,८०० एकर प्रदेशावर असून येथेचा धावपट्ट्या आणि दोन टर्मिनले आहेत. याला नेव्हाडाच्या भूतपूर्व सेनेटर पॅट मॅककरानचे नाव देण्यात आलेले होते. २०२१मध्ये याचे नाव बदलून हॅरी रीड या नेव्हाडाच्या अजून एक सेनेटरचे नाव देण्यात आले.
हा विमानतळ अलेजियंट एर आणि साउथवेस्ट एरलाइन्सच्या मुख्य ठाण्यांपैकी एक आहे. याशिवाय स्पिरिट एरलाइन्स आपले कर्मचारी आणि देखभालीची व्यवस्था येथे ठेवून आहे.
मॅककरान विमानतळ जगातील २४व्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे. २०१३मध्ये या विमानतळावरून ४,१८.५६,७८७ प्रवाशांनी आवागमन केले. त्याच वर्षी येथून ५,२७,७३९ विमानांनी उड्डाणावतरणे केली. यानुसार हा विमानतळ जगात आठव्या क्रमांकाचा आहे
हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.