मेलबर्न विमानतळ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मेलबर्न विमानतळ

मेलबर्न विमानतळ किंवा टुलामरीन विमानतळ (Melbourne Airport) (आहसंवि: MEL, आप्रविको: YMML) हा ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मेलबर्नपासून २३ किमी अंतरावर टुलामरीन ह्या उपनगरामध्ये असलेला हा विमानतळ वर्दळीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी विमानतळाखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९७० साली सुरू झालेला हा विमानतळ मेलबर्नमधील चार विमानतळांपैकी एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

ह्या विमानतळाला ४ टर्मीनल्स असून. टी२ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जातो. इ‌.स.इ.स. २००७ साली या विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू झाले. एरबस ए३८० या जगातल्या सर्वात मोठ्या दुमजली विमानाला आवश्यक असे बदल या विमानतळावर केले गेले. स्कायबस सुपर शटल सेवेद्वारे सद्य स्थितीत या विमानतळावर जाण्या-येण्याची सोय आहे. ही बस मेलबर्नच्या सदर्न क्रॉस स्टेशन ह्या स्थानकावरून सुटते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →