हीर रांझा (१९७० चित्रपट)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

हीर रांझा हा १९७० मधील भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक संगीतमय चित्रपट आहे जो चेतन आनंद दिग्दर्शित आहे आणि त्याचा मुलगा केतन आनंद निर्मित आहे. या चित्रपटात राज कुमार, प्रिया राजवंश, प्राण, पृथ्वीराज कपूर, अजित, जयंत, सोनिया साहनी, कामिनी कौशल, इंद्राणी मुखर्जी, अचला सचदेव आणि टून टून यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत मदनमोहन यांचे आहे. हा चित्रपट पंजाबी कवी, वारिस शाह याने १७६६ मध्ये लिहिलेल्या हीर या महाकाव्य हीर रांजाच्या दंतकथेवर आधारित आहे. वारिस शाहच्या हीर रांजाच्या प्रणय-शोकांतिकेवर आधारीत हा संपूर्ण चित्रपट आणि त्याचे संवाद कवितेत आहेत, जे उर्दू कवी कैफी आझमी यांनी लिहिली आहेत.

या चित्रपटातील गाणी आणि संगीत उल्लेखनीय आहे, तसेच चेतन आनंदच्या बहुतेक चित्रपटांचे चित्रीकरण करणारे आणि चित्रपटासाठी फिल्मफेर पुरस्कार जिंकणारे जल मिस्त्री यांचे छायाचित्रण देखील उल्लेखनीय आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →