जॉनी मेरा नाम

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

जॉनी मेरा नाम हा १९७० मधील हिंदी भाषेतील गुन्हेगारी-अ‍ॅक्शन चित्रपट आहे जो विजय आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात देव आनंद आणि प्राण हे बालपणात विभक्त झालेल्या भावांच्या भूमिकेत आहेत. हेमा मालिनी, जीवन, प्रेमनाथ, आय.एस. जोहर, इफ्तेखार, पद्मा खन्ना हे इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. हा १९७० मधील सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट होता.

१८ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, विजय आनंद यांना या चित्रपटासाठी फिल्मफेर सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार मिळाला, तर आय.एस. जोहर यांना त्यांच्या तिहेरी भूमिकांसाठी विनोदी भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनयाचापुरस्कार मिळाला. हा चित्रपट तमिळमध्ये राजा (१९७२), तेलुगूमध्ये एडुरुलेनी मनीषी (१९७५) आणि कन्नडमध्ये अपूर्व संगम (१९८४) या नावाने पुन्हा बनवण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →