गाइड (चित्रपट)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

गाइड हा विजय आनंद दिग्दर्शित आणि देव आनंद यांनी निर्मित केलेला १९६५ मधील भारतीय द्विभाषिक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ह्यात देव आनंद आणि वहिदा रेहमान यांच्या मुख्य भुमिका आहेत.आर.के. नारायण यांच्या १९५८ च्या द गाईड या कादंबरीवर आधारित हा चित्रपट राज (देव आनंद), एक टूर गाईड आणि रोझी (वहिदा रेहमान) यांची कथा कथन करतो, जी एका श्रीमंत पुरातत्वशास्त्रज्ञाची दमित पत्नी आहे.

गाईड हा बॉक्स ऑफिसवर प्रकाशित झाल्यावर अत्यंत यशस्वी चित्रपट होता व तेव्हापासून हा सर्वोत्कृष्ट बॉलीवूड चित्रपटांपैकी एक मानला जातो. विशेषतः आनंद आणि रेहमान यांच्या कामगिरीसाठी तसेच एस.डी. बर्मन यांच्या संगीतासाठी याला व्यापक समीक्षकांची प्रशंसा मिळाली.

१४ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, गाइडला आघाडीची नऊ नामांकने मिळाली आणि अग्रगण्य ७ पुरस्कार जिंकले ज्यात ४ प्रमुख श्रेणी (सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (विजय), सर्वोत्कृष्ट अभिनेता (देव), आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (रेहमान). अश्या प्रकारे असे करणारा फिल्मफेर पुरस्कारांच्या इतिहासातील हा पहिला चित्रपट ठरला ज्याला हे चार पुरस्कार मिळाले. ३८ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी भारताची अधिकृत प्रवेश म्हणूनही त्याची निवड करण्यात आली होती, परंतु तो नामांकित म्हणून स्वीकारला गेला नाही. २०१२ मध्ये, टाईम मासिकाने "सर्वोत्कृष्ट बॉलीवूड क्लासिक्स" च्या यादीत ह्याला चौथ्या क्रमांकावर सूचीबद्ध केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →