हान्स झिमर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

हान्स झिमर

हांस फ्लोरियन झिमर (जन्म १२ सप्टेंबर १९५७) हे जर्मन संगीतकार आहेत. पारंपरिक वादन पद्धतीमध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करून ते संगीत लिहितात. १९८० सालापासून झिमर ह्यांनी एकूण १५० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. द लायन किंग (ह्या चित्रपटासाठी त्यांना १९९५ साली सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीतकाराचा ऑस्कर पुरस्कार मिळाला), क्रिमसन टाईड, ग्लॅडीयेटर, द पाईरेट्स ऑफ द कॅरीबियनची मालिका, द डार्क नाईट, इंसेप्शन, इंटरस्टेलार, डंकर्क, ब्लेड रनर २०४९ आणि ड्युन हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. त्यांना चार ग्रामी पुरस्कार, तीन क्लासिकल बीआरआयटी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.दिग्दर्शक रिडली स्कॉट, रॉन हाउवर्ड, गोर वर्बीनस्की, माईकल बे, गाय रिची आणि क्रिस्टोफर नोलॅन ह्यांच्या बरोबर झिमर ह्यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →