डेम ज्यूली अँँड्र्यूज डीबीई (जुलिया एलिझाबेथ वेल्स; १ ऑक्टोबर, १९३५ - ) या एक ब्रिटिश अभिनेत्री, गायिका, नृत्यांगना आणि लेखिका आहेत.त्या कला ह्या क्षेत्रामध्ये आठ दशके काम करत आहेत. त्यांना एक ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कार, एक अकादमी पुरस्कार, दोन एमी पुरस्कार आणि तीन ग्रामी पुरस्कार मिळाले आहेत. अँँड्र्यूज ह्यांना डीज्नी लेजेंड म्हणून १९९१ साली किताब मिळाला. त्या व्यातीरीक्त त्यांना ऑनररी गोल्डन लायन आणि एएफआय लाईफ टाईम अचीव्मेंट पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना २००० साली, राणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांच्याकडून अँँड्र्यूज ह्यांच्या कला क्षेत्रातील कामासाठी त्यांना डेम ही पदवी देण्यात आली.
अँँड्र्यूज ह्यांनी लहान वयात गायला आणि अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्या १९४८ साली वेस्ट एंड ह्या नाट्यगृहामध्ये सादर करायला सुरुवात केली. त्यांनी १९५४ साली, द बॉय फ्रेंड ह्या नाटकातून ब्रोड्वेवरती पदार्पण केले.आणि त्यांनी १९५२ साली द सिंगिंग प्रिन्सेस ह्या इटालियन चित्रपटासाठी आपला आवाज दिला.
१९५६ मध्ये सादर झालेल्या माय फेर लेडी ह्या नाटकामध्ये एलायझा डूलिटील ह्या भूमिकेसाठी आणि १९६० साली कॅमलॉट ह्या नाटकातील राणी जेनेवियर ह्या भूमिकेसाठी त्यांचा खूप कौतुक झाले. अँँड्र्यूज ह्यांनी १९६४ साली, मेरी पॉपिन्स ह्या चित्रपटातून चित्रपट अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांना द साऊंड ऑफ म्युझिक मधील मारिया व्हॉन ट्रॅप ह्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.
जुली अँड्रुझ
यामागील विज्ञान आणि इतिहास.