हाथीगुंफा शिलालेख हा ओडिसातील भुवनेश्वर जवळील उदयगिरी येथील हाथीगुंफा येथे इसवी सन पूर्व २ ऱ्या शतकातील कलिंग साम्राज्याचा राजा खारवेल याने कोरलेला शिलालेख आहे. उदयगिरी पर्वतराजीमध्ये असलेला हा शिलालेख सात ओळींचा असून मध्य पश्चिम प्राकृत भाषेत ब्राह्मी लिपीत आहे. कलिंग अक्षरलेखन पद्धतीतील वैशिष्ट्यपूर्ण असा हा लेख असून याचा काल १५० इ.स.पूर्व असल्याचे मानले जाते. खारवेल राजाच्या कारकिर्दीच्या १३ व्या वर्षी सदर लेख कोरला गेला असावा असे अभ्यासकांचे मत आहे. ह्या शिलालेखापासून १० कि.मी. अंतरावर सम्राट अशोकाचा धौलीचा शिलालेख आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हाथीगुंफा शिलालेख
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.