गौतमीपुत्र सातकर्णी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गौतमीपुत्र सातकर्णी

गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन (इ.स. 78 - इ.स. 130) हे सातवाहन वंशातील २३वे सम्राट होते. सातवाहन हा महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा राजवंश होता. सातवाहन राजवंशाने इसवी सनपूर्व २३० ते इसवी सन २२० असे 450 वर्ष महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि आसपासच्या क्षेत्रावर राज्य केले.

या ४५० वर्षांच्या शासन काळात एकूण ३० राजांनी राज्य केले, त्यापैकी गौतमीपुत्र सातकर्णी हे २३वे सम्राट होते. गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या वडिलांचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री होते.



आपल्या नावा आधी आईचे नाव लावणारे हे पहिलेच राजे झाले.

गौतमीपुत्र सातकर्णी हे सातवाहन वंशातील सर्वात पराक्रमी सम्राट होते, सातवाहन साम्राज्याच्या विस्तारात यांचा मोठा वाटा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →