अभिर राजवंश

या विषयातील रहस्ये उलगडा.

अभिर राजवंश

अभिर राजवंश हे पश्चिम दख्खनवर राज्य करणारे एक राजघराणे होते.

त्यांनी सातवाहन साम्राज्याकडून काही भाग जिंकून आपले अभिर साम्राज्य स्थापन केले आणि ढोबळमानाने इ.स. २०३ ते २६० पर्यंत राज्य केले.

तर, वायु पुराणानुसार अभिर राजवंशाने एकूण 167 वर्षे राज्य केले.



अभिर शिवदत्त हे अभिर राजवंशाचे मूळ संस्थापक होते. त्यांचा नाशिकमध्ये राजा म्हणून राज्याभिषेक करून अभिर साम्राज्याला सुरुवात करण्यात आली होती.

म्हणून, येथील अभिर नाशिकचे अभिर म्हणून ओळखले जातात. परंतु काही इतिहासकारांच्या मते अभिर हे खऱ्या अर्थाने ईश्वरसेनच्या अधिपत्याखाली सत्तेत आले. ईश्वरसेनचा नाशिक येथे गुहेत सापडलेला शिलालेख सांगतो की, तो अभिर शिवदत्तचा मुलगा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →