सातवाहन नाण्यांवरील बिरुदे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

प्राचीन भारतातील अशा सातवाहन राजवंशाची नाणी इ. स. पू. १५० च्या सुमारास तयार झाल्याचे दिसून येते. ही नाणी दक्षिण विदर्भ आणि उत्तर तेलंगणामध्ये आढळतात. मौर्योत्तर काळात प्राचीन ‘दक्षिणापथा’त अनेक लहान-लहान स्वतंत्र राजघराण्यांचा उदय झाला. त्यांपैकीच सातवाहन हे एक होते. सातवाहनांच्या उदयापूर्वी दक्षिणपथात आहत नाणी (इंग्लिश:Punch marked coins) चलनात होती. सातवाहन राजांनी राजनामांकित नाणी चलनात आणली. दक्षिणपथात अशा प्रकारची नाणी चलनात आणणारे सातवाहन राजघराणे हे प्रथम होते. तांबे, शिसे, पोटीन (potin) व काही प्रमाणात चांदीची नाणी होती. नाण्यांवरील लेख प्राकृत भाषेत असून ब्राह्मी व खरोष्ठी लिपीचा प्राधान्याने उपयोग केला आहे. नाण्यांवरील बिरुदे गोलाकार, नाण्याच्या डाव्या बाजूला मुख्यतः आहेत.

सातवाहन राजघराण्याच्या पूर्वजांनी यांनी सर्वप्रथम स्वतःचे नाव कोरलेले नाणे चलनात आणले. या राजाची तांब्याची नाणी औरंगाबाद, हैदराबाद, अकोला या ठिकाणी उत्खननात सापडली.



नेवासा, कोंडापूर या ठिकाणी उत्खननात शिशाची नाणी सापडली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →