मराठवाडा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मराठवाडा

मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. छत्रपती संभाजीनगर शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो. कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. कोरडवाहू शेतीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, अंबाजोगाई, परळी आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. पैठणचे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्याची मराठी ही मुख्य बोलीभाषा आहे. मराठवाड्यास संतांची भूमी असे म्हणले जाते. बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी ३ ज्योतिर्लिंग याच भागात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →