भुवनेश्वर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

भुवनेश्वर

भुवनेश्वर ही भारताच्या ओड़िशा राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. भुवनेश्वर शहर ओरिसाच्या पूर्व भागात वसले आहे. महानदी भुवनेश्वरच्या ईशान्येकडून वाहते. १९४६ साली वसवले गेलेले भुवनेश्वर जमशेदपूर व चंदिगढसोबत भारतामधील सर्वात पहिले रेखीव (Planned) शहर होते. १९४८ साली ओरिसाची राजधानी कटकहून भुवनेश्वरला हलवण्यात आली. सध्या भुवनेश्वर ओडिशाचे आर्थिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र आहे. ओडिशा विधानसभा येथेच स्थित आहे. केवळ २५ किमी अंतरावर असलेली कटक व भुवनेश्वर ही भारतामधील प्रमुख जोडशहरे आहेत. हिंदू धर्मामधील चार धाम ह्या सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले जगन्नाथपुरी हे स्थान भुवनेश्वरच्या ६० किमी दक्षिणेस तर कोणार्क सूर्य मंदिर ६५ किमी दक्षिणेस स्थित आहेत.

अनेक सहस्रकांचा इतिहास असलेल्या भुवनेश्वरचा उल्लेख सर्वप्रथम कलिंगच्या युद्धामध्ये आढळतो. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकामध्ये खारवेलने शिशुपालगड येथे आपली राजधानी वसवली. सातव्या शतकात कलिंग साम्राज्याची राजधानी भुवनेश्वर येथेच होती. २०११ साली भुवनेश्वरची लोकसंख्या ८.४३ लाख इतकी होती. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे व शैक्षणिक संस्थांचे नवे केंद्र बनलेले भुवनेश्वर भारतामधील झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →