रुरकेला (हिंदीत रुड़केला, इंग्रजीत Rourkela) हे भारताच्या ओरिसा राज्यातील एक औद्योगिक शहर आहे. रुरकेला शहर ओडिशाच्या उत्तर भागात झारखंड राज्याच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी भुवनेश्वरच्या उत्तरेस ३४० किलोमीटरवर, तर जमशेदपूरच्या नैर्ऋत्येस २२० किमी अंतरावर आहे. २०११ साली रुरकेलाची लोकसंख्या सुमारे २.७२ लाख होती.
रुरकेला येथे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया ह्या नवरत्न सरकारी कंपनीचा मोठा कारखाना आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा ओरिसामधील कॅम्पस हा देखील रुरकेलामध्ये आहे.
रुरकेला
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.