कानपूर (हिंदी: कानपुर; उर्दू: کانپور) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील सर्वात मोठे तर भारत देशातील १२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. कानपूर नगर जिल्हा व कानपूर देहात जिल्हा ह्या दोन्ही जिल्ह्यांचे मुख्यालय असलेले कानपूर दिल्लीखालोखाल उत्तर भारतातील सर्वात मोठे औद्योगिक शहर मानले जाते. कानपूर उत्तर प्रदेशच्या मध्य भागात गंगा नदीच्या पश्चिम काठावर वसले असून ते लखनौच्या ९५ किमी नैऋत्येस तर आग्र्याच्या २८० किमी आग्नेयेस स्थित आहे.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात कानपूरला मानाचे स्थान आहे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान नानासाहेबाने कानपूराला वेढा देऊन ब्रिटिश सैन्याला अडचणीत आणले होते.
कानपूर
या विषयातील रहस्ये उलगडा.